ओबीसी संघर्ष कृती समितीचे निवेदन
प्रतिनिधी/२० ऑक्टोबर
गोंदिया : कुडवा नाका परिसरातील क्षयरोग रुग्णालयाची जागा ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह तसेच केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून मानव संसाधन विकास मंत्री, मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यामार्फत आज (ता.२०) दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने करण्यात आली.


कुडवा नाका परिसरातील जागा सध्या निकामी असून ती जागा चांगल्या उपयोगी पडावी, अशी मागणी समोर आली. त्यातच ५०० विद्यार्थी क्षमतेचा ओबीसी प्रवर्गासाठी विद्यार्थी वसतिगृह आणि वेंâद्रीय विद्यालय जिल्ह्यात मंजूर झाले आहेत. तेव्हा, सध्यास्थितीत पडीत असलेली १८ एकर जागा ही वसतिगृह व केंद्रीय विद्यालयासाठी द्यावी तसेच प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावा, याशिवाय महाराष्ट्र शासनाद्वारे परदेशात उच्च शिक्षणासाठी इतर संवर्गाप्रमाणे ओबीसींच्या विविध शाखेतील १० विद्यार्थ्यांना वर्षाला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राज्य शासनाने इतर प्रवर्ग व खुल्या गटातील विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादेची अट घातलेली नाही. ओबीसींना मात्र ८ लाख रुपये उत्पन्न मर्यादेची अट घातली आहे, ती असंवैधानिक असून अट रद्द करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मानव संसाधन विकास मंत्री व मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, सावन कटरे, मनोज मेंढे,खेमेंद्र कटरे, कैलाश भेलावे, पु्ष्पा खोटेले, कमलबापू बहेकार,लिलाधर गिर्हेपुंजे, सुनील भोंगाडे, डॉ. संजय रहांगडाले, शैलेष बहेकार,सावन डोये,विजय फुंडे,निलेश बोहरे,वाय.टी.कटरे, दिनेश हुकरे,विलास चव्हाण,संतोष पारधी  व रवि भांडारकर यासह मोठ्या संख्येने ओबीसी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours