मुंबई: माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या सुरेंद्र गडलिंग यांच्या याचिकेवर आज (सोमवार) मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार होती. मात्र यावेळी राज्य सरकारच्या वतीनं युक्तिवाद करण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता कोर्टात हजर न राहिल्यानं कोर्टाने सरकारची चांगलीच कानउघडणी केली.
‘या प्रकणात महाधिवक्त्यांनी राज्य सरकारच्या वतीनं युक्तिवाद करावा, असं आम्ही म्हणालो नव्हतो. तर स्वत: महाधिवक्तांनीच आपण हजर राहणार असल्याचं सांगितलं. मग ते आज कोर्टात हजर का नाहीत,’ असा उद्विग्न सवाल कोर्टाने विचारला आहे. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी स्वत: युक्तिवाद करणार असून उद्यापर्यंत ही सुनावणी तहकूब करावी, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीनं याआधी करण्यात आली. पण आजच्या सुनावणीला ते हजर राहिले नाहीत.
महाधिवक्ता नागपूर खंडपीठात असल्यानं ते आज मुंबई हायकोर्टात हजर राहू शकले नसल्याचं राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने अखेर या प्रकरणाची सुनावणी उद्या ठेवली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours