पुणे 23 ऑक्टोबर : पाण्यासंबंधी पुणेकरांसाठी एक वाईट बातमी आहे. पुण्यात दिवाळीनंतर पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार आहे. दिवाळीनंतर शहरात एक वेळच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळी जरी आनंदात गेली तरी दिवाळीनंतर पाणी संकट ओढावणार इतकं नक्की.
यासंबंधी आज महापौरांनी पाण्याच्या पुरवठ्याच्या नियोजनासाठी महत्वपूर्ण बैठक बोलवली आहे. दरम्यान, शहराला पाणी पुरवठा कराणाऱ्या खडकवासला आणि पानशेत, वरसगाव आणि चेमघर धरणात गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने पुण्याला यंदा पाणीकपातीला सामोरं जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे दिवाळीनंतर पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार असून शहरात एकच वेळ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
पाणी पुरवठा कसा करायचा याचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून आज पक्षनेते आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या बैठकीत सहमती झाली तर ते हे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. मात्र त्याची त्याची अंमलबजावणी दिवाळी झाल्यानंतर करण्यात येईल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours