" त्याच्या डोक्यावरच होर्डिंग्जचा एक मोठा लोखंडी तुकडा अडकलेला रक्तबंबाळ झालेला माणूस पळत पळत ससूनच्या दिशेने गाड्यांना थांबवून स्वतःसाठी लिफ्ट मागत होता पण त्याला कुणी लिफ्ट देत नव्हतं, शेवटी मीच माझ्या दुचाकीवर स्टोलने बांधून त्याला ससून रुग्णालयाकडे घेऊन निघाले"

प्रादेशिक परिवहनकडून जुन्या बाजाराकडे येणाऱ्या रस्त्यावरील चौकात एका खासगी कंपनीचे होर्डिंग कोसळून चौघांचा मृत्यू झाला. अनधिकृतपणे हे रेल्वेच्या जागेत उभारण्यात आले होते. होर्डिंग काढण्याचे काम सुरू असताना अचानक ते कोसळले. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथून समोरच्या सिग्नलवर सामाजिक कार्यकर्त्या गायत्री पाठक उभ्या होत्या
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours