मुंबई: विलेपार्ले भागात विहिरीत पडून तीन जणांचा मृत्यू झालाय. यात 3 वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. सात महिलांना वाचविण्यात यश मिळालं असून विहिरीत आणखी काही महिला अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. पूजेचा कार्यक्रम सुरू असताना ही अचानक विहिरीचा कठडा तुटल्यामुळे ही घटना घडली.
विलेपार्ल्यातील सॅटेलाईट हॉटेलजवळ रुईया बंगलो इथं संध्याकाळी 6.30 वाजता ही घटना घडली.प्रसिद्ध शिवसागर हॉटेल जवळ असलेल्या विहिरीजवळच्या मंदिरात विश्वकर्मा समाजाच्या महिला जितिया पुजेसाठी गेल्या होत्या. पुजेनंतर त्या महिला विहिरीवर गेल्या. मात्र विहिरीचा स्लॅब तुटल्यानं महिला विहिरीत कोसळल्या अशी प्राथमिक माहिती हाती येतेय.
स्थानिकांनी महिलांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. साडी आणि ओढणीच्या मदतीनं महिलांना बाहेर काढण्यात आलं.. मात्र माधवी पांडे, रेणू यादव आणि दिव्या या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतलं पाणी उपसून बचाव कार्याला सुरूवात केली. सध्या विहिरीतल्या पाण्याचा उपसा पूर्ण झाल्याचं कळतंय.
Post A Comment:
0 comments so far,add yours