06 आॅक्टोबर :  फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे
राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे,नागपूर, औरंगाबाद,मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक,लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळपत्रक जाहीर केलंय.
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू होणार आहे. बारावीची परीक्षा 20 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. तर दहावीची परीक्षा 1 मार्च रोजी पहिला पेपर होईल आणि 22 मार्चपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसंच विद्यार्थ्यांच्या मनावरील तान कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2019 च्या लेखी परीक्षेचे हे संभाव्य वेळापत्रक असल्याचं मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलंय.
तसंच हे 2018-19 पासून दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनर्परीक्षार्थ्यांकरित अंतिम संधी असलेले जुन्या अभ्यासक्रमाकाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर अंतिम वेळापत्रक हे सर्व शाळा-महाविद्यालयांना दिले जाणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019
दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2019
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours