कल्याण : छेडछाडीचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणासह काकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याण येथील काळा तलाव परिसरात घडलीये. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे
काळा तलाव परिसरात सकाळी आणि रात्री फिरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. जेष्ठ नागरिकांसह महिला वर्ग सुरक्षित ठिकाण म्हणून या परिसरात फिरण्यासाठी येतात मात्र याच परिसरात आज संध्याकाळी एका तरुणीची छेड काढण्यात आली.
या छेड काढणाऱ्या टोळक्याला जाब विचारत विरोध करणाऱ्या अनरजीत सोनार या तरुणासह त्याच्या काकावर देखील प्राणघातक हल्ला करण्यात आलाय.
काळा तलाव परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे  आज संध्याकाळी याच परिसरातून जाणाऱ्या एका तरुणीची काही जणांनी छेड काढली. ही बाब या ठिकाणी असणाऱ्या अनरजित सोनार यांच्या लक्षात आल्याने त्याने छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारला.
त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी अनरजीत सह त्याच्या काकाबरोबर वाद घालत त्या दोघांवर प्राणघातक हल्ला केला. या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात या टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours