खोपोली, 08 डिसेंबर : मराठा आरक्षण न्यायलायत टिकणार नाही असं विधान केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची आग्रही भूमिका असल्याचंही रामदास आठवले म्हणाले आहेत.
खोपोली येथे जिल्हा युवक मेळाव्यादरम्यान पत्रकार परिषदमध्ये बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलं आहे. तर मंदिरं, पुतळे बांधले नाहीत तर मतं मिळणार नाहीत असंही आठवले म्हणाले. त्याचबरोबर भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युती भाजपाला फायदेशीर असल्याचा उल्लेखही त्यांनी या परिषदेत केला.
यावेळी त्यांनी राम मंदिर वादावरही भाष्य केलं. अयोध्येतील जागा ही बौद्ध समाजाची असून ती वादग्रस्त आहे. त्याबदल्यात आमहाला दुसरीकडे जागा मिळावी. तर याआधीही त्यांनी या विषयावर विधान केलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours