पुणे, 22 जानेवारी : अडीच वर्षाच्या मुलाची आणि पत्नीची हत्या यांची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने घरातील भिंतीवर रक्ताने एक संदेशही लिहला आहे.
पत्नी आणि मुलाची हत्या घरगुती वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्या केल्यानंतर नराधमाने भिंतीवर पत्नी आणि मुलाच्या रक्ताने एक संदेशही लिहला आहे. 'मैं किसको नहीं छोडूंगा, निकल जाओ मेरे घरसे,' असं या संदेशात त्यानं लिहिलं आहे.
क्रूरपणे आपल्या पत्नीसह पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या आयाज शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. बंडगार्डन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या भयानक हत्याकांडानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली. पत्नी आणि पोटच्या मुलाची इतक्या निष्ठुरपणे हत्या करण्यापर्यंत या आरोपीची मजल कशी गेली, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता पोलीस तपासात नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहावं लागेल.
Post A Comment:
0 comments so far,add yours