मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबईत चर्चा असते ती धोकादायक इमारतींची. महापालिका अश इमारतींची पाहणी करून त्याचं वर्गिकरण करत असते. मुंबईत अतिधोकादायक इमारतींची संख्या तब्बल 499 असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. पावसाळ्यात या इमारती पडण्याची भिती असल्याने त्यात राहणाऱ्या नागरिकांनी त्या तातडीने खाली कराव्यात असं आवाहन महापालिकेने केलं आहे.
मुंबईत अतिधोकादायक इमारतींची संख्या ही 499 इतकी आहे. म्हणजेच या इमारती राहण्यायोग्य नाहीत. अशा इमारतींना पालिका 354 अंतर्गत घर रिकामे करण्याची नोटीस बजावते.पण अनेकदा या इमारती खाजगी असल्याने रहिवासी घर रिकामे  करीत नाहीत. 499 अधिकाधिक इमारती या खाजगी मालमत्ता आहेत. पैकी 50 इमारती या पालिका, राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारच्या आहेत.
अशी आहे धोकादायक इमारतींची संख्या
वॉर्ड                 उपनगर                            धोकादायक इमारती
एन वॉर्ड            घाटकोपर विक्रोळी पश्चिम            63

के वेस्ट       अंधेरी पश्चिम               51

टी वॉर्ड        मुलुंड                       47

के ईस्ट      अंधेरी पूर्व                38

पी नॉर्थ       मालाड पश्चिम           35

पावसाळ्यात दरवर्षी अशा इमारतती पडून त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. महापालिकेने नोटीस दिली तरी हे त्या इमारतीत राहणारे लोक त्यातून बाहेर पडत नाहीत. राहतं घरं सोडून आम्ही कुठे राहायला जायचं असा या नागरिकांचा सवाल असतो.  एकदा घर सोडलं तर बिल्डर किती वर्षांनी तो घर बांधून देईल याची काहीच शाश्वती नसते. आणि महापालिकाही अशा लोकांची सोय करत नाही. त्यामुळे जीवावर उदार होऊन ही मंडळी त्याच ठिकाणी वास्तव्य करतात.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours