औरंगाबाद : औरंगाबादमधील करमाड इथं रेल्वे रुळावर झोपलेले 16 मजूर रेल्वेखाली आल्याने जागीच ठार झाले आहेत. औरंगाबाद-जालना रेल्वे लाईनवर करमाड शिवारात परराज्यातील 16 मजूर रुळावर झोपले होते. आज सकाळी साडेसहा वाजता रेल्वेखाली आल्याने या मजुरांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे हे मजूर मिळेल त्या रस्त्याने घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशा स्थितीत रात्रीच्या विसाव्यासाठी रेल्वे रुळाचा आधार घेणाऱ्या 16 मजुरांवर औरंगाबादमध्ये काळाने घाला घातला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours