भंडारा:- जवळच्या गणेशपुर येथील आदर्श नगरातील रहिवासी अमोल दादाराम मस्के (४१ वर्षे) यांचे दीर्घ आजारामुळे नागपूर येथील ओरिअस हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान गुरूवार दिनांक १२ जानेवारी ला सकाळी ५ वाजेच्या सुमारास दु:खद निधन झाले. 

       त्यांच्या पार्थिवावर भंडारा येथील वैनगंगा नदीच्या काठावरील स्मशानभूमीवर गुरूवारला दुपारी १ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. 

    त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई- वडील, दोन भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. 

शोकसभा सेवानिवृत्त वन कर्मचारी विजय मेहर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. 

    त्याप्रसंगी जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व अमोल मस्के यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

ते सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के व पोलीस विभागात कार्यरत लोकेश मस्के यांचे ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours