रिपोर्टर- परदेशी

        काल आलेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने किन्ही /गुंजेपार ते मासळ मार्ग बंद होता. या मार्गावर काटेरी बाभुळीचे झाड पडले होते त्यामुळे सदर मार्ग बंद होता व पडलेले झाड हे काटेरी असल्याने कुणीही झाड बाजुला करण्यास धजावत नव्हते अखेर गावातीलच काही युवक जे सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात त्या युवकांनी वेळीच श्रमदानातून मदत करुन तो काटेरी झाड रस्त्याच्या बाजूला केले व बंद असलेले किन्ही /गुंजेपार ते मासळ मार्ग सुरू केलेला आहे. त्यामुळे गावकर्यां कडुन वाहवा केली जात आहे.             या सामाजीक कार्यात कपिल दाणी, गणेश दाणी, चोपराम भागडकर, चंदन दाणी, शुभम दाणी, अर्जुन दाणी, नितेश शहारे, जनार्दन नंदागवळी, दयाराम दाणी, विकास नंदागवळी यांनी दौलत दाणी व सरपंच उत्तम भागडकर यांच्या मार्गदर्शनात सदर कार्य पार पाडले.

मौजा. माटोरा येथिल शेति विकणे आहे. तिन येकड, भाव 7,50,000 , मो.न.7588766047, 7558657987
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours