अकोला : राज्यातील इतर मागावसवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहीजे, अशी आमची असून, मराठा आरक्षणाचे राजकारण होऊ नये, असे मत भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना राज्यातील ‘ओबीसी’पर्यंत पोहोचविणे तसेच ‘ओबीसी’मधील भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने २२ जुलैपासून विदर्भात संवाद संपर्क अभियान सुरु करण्यात आले असून, ओबीसीमधील ३४८ जाती आणि विविध संघटनांसोबत संवाद साधून, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संवाद संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ‘ओबीसी’अंतर्गत विविध घटकांची माहिती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले. या अभियानानंतर भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने राज्यात ‘ओबीसी जोडो ’ अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगत, ओबीसींमधील वंचीत, दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनामार्फत करण्यात येत असल्याचेही विजय चौधरी यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर पाटील, विभागीय अध्यक्ष सुभाष घाटे, अकोला शहर अध्यक्ष जयंत मसने, डॉ.विनोद बोर्डे उपस्थित होते.

आघाडी सरकारने केवळ ठराव घेतला; फडणवीस सरकारने कायदा केला !
यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षणासाठी विधानसभेत केवळ ठराव घेतला; मात्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कायदा केला. मराठा आरक्षणासाठी कायदा करणारे फडणवीस सरकार राज्यातील पहिले सरकार आहे, असा दावा करीत, मराठा आरक्षणासाठी यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours