भंडारा जिल्हा संपादक शमीम आकबानी
रिपोर्टर- सय्यद जाफरी, कैमरामैन- सलीम मिझा
भंडारा-भाजप सरकारने पेट्राेल ,डिझेल व गँस सिलेंडराच्या दरात भरमसाठ वाढकेल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर हाेऊन महागाई वाढत चालली आहे .केन्द्र व राज्य सरकारकडुन आकारल्या जाणाऱ्या विवीध करांमुळे पेट्राेल -डिझेल ची सातत्याने दरवाढ हाेत आहे .त्यामुळे पेट्राेल डिझेल व गँस चे दर कमी करन्यात यावे या सह अन्य मागन्यांसाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतिने जिल्हा धिकारी कार्यालय पर्यंन्त दुचाकी ढकलत नेऊन माेर्चा काढन्यात आला.
सध्या पेट्राेल चे भाव ८६ रु.,डिझेल चे भाव ७३रुपये,व गँस सिलेंडर चे ८८१रु. आहे .मागिल लाेकसभा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या उमेदवारांनी निवडुन आल्यावर महागाई कमी करु असे पक्षातर्फे आश्वासन दिले हाेते मात्र आश्वासन पाळण्यात भाजप सरकार अपयशी ठरलेली आहे उलट पेट्राेल डिझेल चे दर वाढवुन सामान्य जनतेचा बजट बिघडवीत आहे.तसेच विजेचे दर कमी करन्यात यावे. बेराेजगारांना राेजगार देण्यात यावा या सह विवीध समस्यां मार्गी लावन्यात यावा.अन्यथा तिव्र आंदाेलनाचा इशारा या वेळेस जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस चे धनंजय दलाल यांनी दिला। निवेदन देतांना प्रामुख्याने राष्ट्रवादीचे,भंडारा गाेंदिया चे खासदार मधुकर कुकडे,धनंजय दलाल,नानाभाऊ पंचबुद्धे,अभिषेक कारेमाेरे,लाेकेश खाेब्रागडे,विकास गभणे,धनुभाऊ व्यास,उर्मीला आगाशे व राष्ट्रवादीचे सैकडाे कार्यकर्ते उपस्थित हाेते.



विडियो  देखे-

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours