मुंबई, 16 एप्रिल : लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज सायंकाळ पाच वाजता थंडावणार आहेत. महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारसंघातील प्रचार आज थांबणार आहे. प्रचाराच्या शेवटचा दिवस असल्याने या मतदारसंघातील सर्व दिग्गज उमेदवार शेवटच्या क्षणपर्यंत प्रचार करतील.
निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये अनेक दिग्गजांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून, प्रीतम मुंडे बीडमधून, सोलापुरातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कुणा-कुणाच्या सभा झाल्या?
मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा झंझावात पाहायला मिळाला.
अखेरच्या क्षणापर्यंत उडणार प्रचाराचा धुरळा
दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक पक्षाकडून सभा आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
- नांदेड लोकसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांचा रोड शो
- वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशवंत भिंगे यांच्यासाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची सभा
- भाजपा उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्यासाठी अभिनेत्री इशा कोप्पीकर यांचा रोड शो होणार आहे
- अकोला इथं नितीन गडकरींची सभा
- लातूरमधील उदगीर इथं  देवेंद्र फडवणीस यांची सभा
- बीड मध्ये पंकजा आणि धनंजय मुंडे यांची त्यांच्या पक्षाच्या उमेदवार यासाठी सभा होणार
- सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे हे पदयात्रा काढत मतदारांसोबत संवाद साधणार

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours