सोलापूर, 16 एप्रिल : सोलापूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार खाली खेचून नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडी देशाच्या राजकीय क्षितीजावरून दूर करा, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. पण यावेळी राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे वंचित बहुजन आघाडीवरही भाष्य केलं आहे.
राज ठाकरे यांनी भाजपला मतदान  करू नका असं सांगत असतानाच भाजपला मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका, असंही आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांच्या या विधानाचा रोख थेट वंचित बहुजन आघाडीकडे होता. कारण सोलापूरमध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हेदेखील रिंगणात असणार आहेत.
वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत असतो. अशातच राज ठाकरे यांनीही हाच धागा पकडत वंचित आघाडीला मतदान न करण्याच अप्रत्यक्ष आवाहन केलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours