नाशिक- चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहानानं चिरडलं.  या अपघातात तीन ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी भाविकांवर कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांकरीता नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
खालप (ता. देवळा) येथील कळवण शहरापासून चार किमी अंतरावर कोल्हापूर फाटा परिसरात काही भाविक पायी जात होते.  नाशिककडून कळवणकडे येणाऱ्या भरधाव चारचाकीने भाविकांना जोरदार धडक दिली. मृतांमध्ये एका बालकाचा मृत्यु झाला आहे.
दरम्यान, सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव १३ एप्रिल रामनवमीपासून सुरु झाला आहे. खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक देवीच्या दर्शनसाठी गर्दी करीत आहेत तर लाखो भाविक सप्तशृंगी देवीच्या गडाच्या दिशेने पायी येत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours