नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. नेत्यांची वक्तव्यांनी वातावरण तापलं आहे. अनेक पक्षांच्या वाचाळवीरांनी केलेल्या वक्तव्यामुळे आज वातावरण तापलं आहे. बसपाच्या नेत्या मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचारासाठी काही दिवसांसाठी प्रचारासाठी बंदी घातली. तर आझम खान यांच्यावर देशभरातून तीव्र टीका झाली. हे होत असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिलीय.

सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर ठरवलं असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. याच मुद्यावर आधारीत होता आजचा 'आर पार' हा कार्यक्रम. या कार्यक्रमात बोलताना भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, पचास साल का बच्चा बिल्कुल नहीं है सच्चा. राहुल गांधी हे खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours