श्रीनगर, 25 एप्रिल : सीमारेषेवर दहशवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी पहाटेदेखील जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. अनंतनागमधील बिजबेहरा येथे ही चकमक सुरू झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आताही येथे चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचे असल्याचं म्हटलं जात आहे. परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानुसार शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सध्या जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून ऑपरेशन ऑलआऊट तीव्र स्वरुपात राबवण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours