नागपूर, 8 जानेवारी : नागपुरातील रॅडीसन ब्लू या हॉटेलमधील मोठं सेक्स रॅकेट पोलिसांनी उघड केलं आहे. गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात एका तरुणीला आणि एका महिला दलालाला अटक करण्यात आली आहे.

रॅडीसन ब्लू या हॉटेमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने या हॉटेलवर छापा टाकला. यावेळी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवणारी दलाल माया पुजाराव हिला अटक करण्यात आली आहे. सोबतच एका तरुणीलाही पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

माया पुजाराव ही दलाल देश-विदेशातील हायप्रोफाईल ग्राहकांना तरुणी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. रॅडिसन ब्लू नागपूरातील पंचतारांकित हॉटेल असून अनेक दिग्गज लोक, सेलिब्रेटी इथं राहतात.

काही दिवसांपूर्वीही अशीच कारवाई

सप्टेंबर महिन्यातही नागपूर पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यावेळी दलाल असलेली महिला आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली. तसंच दोन युवतींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं.

नागपूरच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल देह व्यापार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आपल्या माणसाला त्या ठिकाणी ग्राहक बनवून पाठविलं आणि या सगळ्या रॅकेटची सूत्रधार असलेल्या प्रणिता जयस्वाल नावाच्या महिलेला तो भेटला आणि मग सगळा पर्दाफाश झाला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours